Pages

Pages

रविवार, १५ जुलै, २०१२

सोबती


सोबती


आनंदामध्ये माझ्या

वाटा घेण्यास,ते सर्व येतात

दुःखावर माझ्या फुंकर

घालण्यास , ते सर्व येतात



अश्रू गाळताना मी

ते पुसण्यासाठी ते सर्व येतात

जगताना मी मला जगण्याची

उमेद देण्यासाठी ते सर्व येतात.



स्वप्न पाहताना मी मला

वास्तवात आणण्यासाठी

ते सर्व येतात.

यशासाठी झगडताना मी

मला बळ देण्यासाठी ते सर्व येतात.



प्रेमाचा राग आवळताना मी

मला साथ करण्यासाठी ते सर्व येतात.

वाट पाहताना मी तुझी

आशेचा किरण दाखवण्यासाठी

ते सर्व येतात.



गोंधळू नका मित्रांनो ..... !
ती तर माझ्या हृदयाची स्पंदने असतात.

मला वाटतं !


मला वाटतं !


मला वाटतं ...... !

पक्षी मी बनावं, आकाशात स्वैर मी फिरावं

तुझ्या इच्चापुर्तीसाठी, भरपूर कष्ट मी करावं.



मला वाटतं ...... !

नदी मी बनावं, खाचखळग्यातून स्वच्छंद वाहावं

तुझ्या गोड स्मृतीत बुडून मी जावं.



मला वाटतं ...... !

वारा मी बनावं, वेगाने चहुकडे मी जावं

वाहताना तुझ्या कोमल कायेला अलगद मी स्पर्शावं.



मला वाटतं ...... !

हृद्य मी बनावं, तुझ्या ओठावरील हर

शब्दांना तुझ्या आधी मी जाणावं.



मला वाटतं ...... !

पेच प्रसंग


पेच प्रसंग



सांगा मित्रांनो

प्रेम मी कसं करावं?

तरुण स्त्री सुलभ मनाला मी कसं भूलावाव

स्वच्छंद ह्या पाखराला कैदेत कसं मी टाकावं .



सांगा मित्रांनो

प्रेम मी कसं करावं?

भावनांच्या आवेगाला कसं मी तीजपर्यंत

पोहचवाव,

निखळ अशा मैत्रीला आमच्या प्रेमाचं नाव

कसं मी द्यावं.



सांगा मित्रांनो,

प्रेम मी कसं करावं ?

बेफाम ह्या सागराला कवेत कसं मी घ्यावं

ध्येयाला अडथळा ठरू पाहणाऱ्या,

ह्या प्रेमाला माझ्या,

स्मशानात कसं मी गाडाव.



सांगा मित्रांनो,

प्रेम मी कसं करावं ?

परिणीता


परिणीता


आभारी आहे मी तुझा

मला नाकारल्याबद्दल ...!



प्रेम हा माझा अधिकार नाही

ह्याची जाणीव करून दिल्याबद्दल.



आभारी आहे मी तुझा

काही क्षण माझ्यासोबत चालल्याबद्दल.



माझ्या स्वप्नंचे सुंदर घरटे

मोडण्यात हातभार लावल्याबद्दल.



आभारी आहे मी तुझा

आभाळातून थेट मला जमिनीवर

आणल्याबद्दल.......!



माझ्या 'स्वत्वाला' पायदळी

तुडविल्याबद्दल .



आभारी आहे मी तुझा

प्रेमाचा खरा आनंद होकारात नसतो.



तर तो नकारात देखील असतो,

हे कृतीतून समजावून सांगितल्याबद्दल.......!

निश्चय


निश्चय


आता मीही ठरवलंय

आलेल्या संकटांना धैर्याने, सामोरं जायचं,

अजिबात नाही डगमगायचं.



समाजबांधवांना आता नाही जुमानायचं

नवीन समाजाला घडवायचं.



आता मीही ठरवलंय

मोठं सपानं पहायचं

कष्ट उपसून ते मिळवायचं.



कधीच नाही रडायचं

हसत दुःखांना कवटाळायचं.



आता मीही ठरवलंय

सतत अरीष्टांशी लढायचं

मुर्दाड आयुष्य नाही जगायचं



वेळ पडली तर मरणाला जवळ करायचं

पण सग्या सोयार्यांना नाही बोलवायचं



आता मीही ठरवलंय !

दुःखाचे दुःख


दुःखाचे दुःख


सांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?



का म्हणून सर्वांनीच आम्हास झिडकरावं

सुखाचे स्वागत सुहास्य वदनानं प्रत्येकानं

नेहमी करावं.



पण सुखाचं अस्तित्व दुःखाविना नाही

हे भाबड्या मनांना कोणी समजावं ?



सांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?



का म्हणून सुखाचं भागीदार प्रत्येकानं बनावं

सुखासाठी कशासाठी प्रत्येकानं अहोरात्र झुरावं

पण दुःखाची चाहूल लागताच प्रत्येकानं

का नातं विसरावं ?

का म्हणून दुःखाच्या वाट्यालाच हे

दुःख का यावं ?



सांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?



तू गेल्यापासनं


तू गेल्यापासनं


तू गेल्यापासनं....................!

दारचा गुलाब कधी फुललाच नाही

चाफ्याचा सुगंध परसदारी कधी दरवळलाच नाही



तू गेल्यापासनं....................!

अंगणातला मोगरा कधी बहरलाच नाही,

जाईचा वेल तो मांडवावर कधी चढलाच नाही.



तू गेल्यापासनं....................!

पौर्णिमेचा चंद्र मी कधी पहिलाच नाही.

त्यानंतर गोड स्मृतीतून तुझ्या

मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केलाच नाही.



तू गेल्यापासनं....................!

सुखाने माझ्या दारचा रस्ता कधी धरलाच नाही

दुःखाने माझ्या घरातून कधी मुक्काम हलवलाच नाही.

गरज


गरज


आयुष्याच्या सागरात पोहताना

लाटांवर स्वार होण्यासाठी तुझी

साथ मला हवी होती.



ध्येयातील असंख्य अडथळे

पार करताना

तुझी मदत मला हवी होती.



रोज आरश्यासमोर उभे राहताना

तुझी पुसटशी प्रतिमा त्यात

मला समोर हवी होती.



श्रावण सरीत चिंब ओलावताना

अंगावर जलबिंदू घेताना,

तुझी उपस्थिती मला हवी होती.



डोळ्यातील निशब्द भावनांना

जाणणारी भिडस्त आश्वासक नजर मला हवी होती.



करीयरच्या नागमोडी वळणावर

एकाकी मला भासतांना,

तुझ्या संगतीत घालवलेल्या

क्षणिक गोड क्षणांचीच

आठवण मला हवी होती.



न पूर्ण होणारे स्वप्न पाहताना

तू काही क्षण का होईना

माझ्या जवळ मला हवी होती.



कोण ?


कोण ?


खरं कोण आहेस गं तू माझी ?

मी दुःखात असताना

देतेस मनापासून साथ

मी संकटात असताना

देतेस ताणापासून हात.



खरं कोण आहेस गं तू माझी ?

मी रडताना आसवे

गळतात गं तुझ्या डोळ्यातून

मी हसताना आनंद

ओसंडतो तुझ्या रोमारोमातून



खरं कोण आहेस गं तू माझी ?

वादळातील माझ्या जहाजाला

देतेस गं तूच किनारा.

हृदयात उचंबळनाऱ्या भावनांना !

देतेस गं तूच थारा.



खरं कोण आहेस गं तू माझी ?

मी तुझ्याशी नातं जोडावं

एवढी लायकी नाही गं माझी

समाजबांधवांनी -रीवाजांनी

पंचाईत केली आहे गं माझी



खरं कोण आहेस गं तू माझी ?

तुझी बदनामी होऊ नये

एवढीच इच्छा मनापासून

आहे गं माझी.

म्हणून खरं सांगतो

तू कोणीच नाही गं माझी.

कळलंच नाही


कळलंच नाही


आठवण तुझी आल्यावर

रात्रीची पहाट कधी झाली

मला कळलंच नाही.



आठवण तुझी आल्यावर

डोळ्यातील आसवे गालावर कधी आली

मला कळलंच नाही.



आठवण तुझी आल्यावर

आप्तस्वकीयातून मी

अनोळखी विश्वात कधी आलो.

मला कळलंच नाही.



आठवण तुझी आल्यावर

कागदावर भावना रेखाटता-रेखाटता

मी कधी कवी झालो,

मला कळलंच नाही.

१४ ऑगस्ट


१४ ऑगस्ट


तो दिवस होता,

आपल्या शेवटच्या भेटीचा

तो दिवस होता,

आपल्या प्रेमाच्या सूर्याने अस्ताला

जाण्याचा.



तो दिवस होता,

भलभलनाऱ्या जखमेवरची

खपली निघल्याचा.



तो दिवस होता,

आसवाच्या पुरात वाहून जाण्याच्या



तो दिवस होता,

अमावास्येच्या नभात चंद्राचा

शोध घेण्याचा.



तो दिवस होता,

आत्म्याविना शरीराने जगण्याचा

निर्णय घेण्याचा.



तो दिवस होता,

दोन राष्ट्रातील विभागणीचा



तो दिवस होता,

परत फाळणीची पुनरावृत्ती होण्याचा

फरक एवढाच आहे की,

भूमी ऐवजी मन दुभंगण्याचा.



तो दिवस होता,

१४ ऑगस्ट २००६.