गरजआयुष्याच्या सागरात पोहतानालाटांवर स्वार होण्यासाठी तुझीसाथ मला हवी होती.ध्येयातील असंख्य अडथळेपार करतानातुझी मदत मला हवी होती.रोज आरश्यासमोर उभे राहतानातुझी पुसटशी प्रतिमा त्यातमला समोर हवी होती.श्रावण सरीत चिंब ओलावतानाअंगावर जलबिंदू घेताना,तुझी उपस्थिती मला हवी होती.डोळ्यातील निशब्द भावनांनाजाणणारी भिडस्त आश्वासक नजर मला हवी होती.करीयरच्या नागमोडी वळणावरएकाकी मला भासतांना,तुझ्या संगतीत घालवलेल्याक्षणिक गोड क्षणांचीचआठवण मला हवी होती.न पूर्ण होणारे स्वप्न पाहतानातू काही क्षण का होईनामाझ्या जवळ मला हवी होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा