सागर वाव्हळ: गरज

गरज


गरज


आयुष्याच्या सागरात पोहताना

लाटांवर स्वार होण्यासाठी तुझी

साथ मला हवी होती.



ध्येयातील असंख्य अडथळे

पार करताना

तुझी मदत मला हवी होती.



रोज आरश्यासमोर उभे राहताना

तुझी पुसटशी प्रतिमा त्यात

मला समोर हवी होती.



श्रावण सरीत चिंब ओलावताना

अंगावर जलबिंदू घेताना,

तुझी उपस्थिती मला हवी होती.



डोळ्यातील निशब्द भावनांना

जाणणारी भिडस्त आश्वासक नजर मला हवी होती.



करीयरच्या नागमोडी वळणावर

एकाकी मला भासतांना,

तुझ्या संगतीत घालवलेल्या

क्षणिक गोड क्षणांचीच

आठवण मला हवी होती.



न पूर्ण होणारे स्वप्न पाहताना

तू काही क्षण का होईना

माझ्या जवळ मला हवी होती.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai