सागर वाव्हळ: सोबती

सोबती


सोबती


आनंदामध्ये माझ्या

वाटा घेण्यास,ते सर्व येतात

दुःखावर माझ्या फुंकर

घालण्यास , ते सर्व येतातअश्रू गाळताना मी

ते पुसण्यासाठी ते सर्व येतात

जगताना मी मला जगण्याची

उमेद देण्यासाठी ते सर्व येतात.स्वप्न पाहताना मी मला

वास्तवात आणण्यासाठी

ते सर्व येतात.

यशासाठी झगडताना मी

मला बळ देण्यासाठी ते सर्व येतात.प्रेमाचा राग आवळताना मी

मला साथ करण्यासाठी ते सर्व येतात.

वाट पाहताना मी तुझी

आशेचा किरण दाखवण्यासाठी

ते सर्व येतात.गोंधळू नका मित्रांनो ..... !
ती तर माझ्या हृदयाची स्पंदने असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai