सागर वाव्हळ: कळलंच नाही

कळलंच नाही


कळलंच नाही


आठवण तुझी आल्यावर

रात्रीची पहाट कधी झाली

मला कळलंच नाही.आठवण तुझी आल्यावर

डोळ्यातील आसवे गालावर कधी आली

मला कळलंच नाही.आठवण तुझी आल्यावर

आप्तस्वकीयातून मी

अनोळखी विश्वात कधी आलो.

मला कळलंच नाही.आठवण तुझी आल्यावर

कागदावर भावना रेखाटता-रेखाटता

मी कधी कवी झालो,

मला कळलंच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai