सागर वाव्हळ: परिणीता

परिणीता


परिणीता


आभारी आहे मी तुझा

मला नाकारल्याबद्दल ...!प्रेम हा माझा अधिकार नाही

ह्याची जाणीव करून दिल्याबद्दल.आभारी आहे मी तुझा

काही क्षण माझ्यासोबत चालल्याबद्दल.माझ्या स्वप्नंचे सुंदर घरटे

मोडण्यात हातभार लावल्याबद्दल.आभारी आहे मी तुझा

आभाळातून थेट मला जमिनीवर

आणल्याबद्दल.......!माझ्या 'स्वत्वाला' पायदळी

तुडविल्याबद्दल .आभारी आहे मी तुझा

प्रेमाचा खरा आनंद होकारात नसतो.तर तो नकारात देखील असतो,

हे कृतीतून समजावून सांगितल्याबद्दल.......!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai