सागर वाव्हळ: तू गेल्यापासनं

तू गेल्यापासनं


तू गेल्यापासनं


तू गेल्यापासनं....................!

दारचा गुलाब कधी फुललाच नाही

चाफ्याचा सुगंध परसदारी कधी दरवळलाच नाहीतू गेल्यापासनं....................!

अंगणातला मोगरा कधी बहरलाच नाही,

जाईचा वेल तो मांडवावर कधी चढलाच नाही.तू गेल्यापासनं....................!

पौर्णिमेचा चंद्र मी कधी पहिलाच नाही.

त्यानंतर गोड स्मृतीतून तुझ्या

मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केलाच नाही.तू गेल्यापासनं....................!

सुखाने माझ्या दारचा रस्ता कधी धरलाच नाही

दुःखाने माझ्या घरातून कधी मुक्काम हलवलाच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai