सागर वाव्हळ: दुःखाचे दुःख

दुःखाचे दुःख


दुःखाचे दुःख


सांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?का म्हणून सर्वांनीच आम्हास झिडकरावं

सुखाचे स्वागत सुहास्य वदनानं प्रत्येकानं

नेहमी करावं.पण सुखाचं अस्तित्व दुःखाविना नाही

हे भाबड्या मनांना कोणी समजावं ?सांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?का म्हणून सुखाचं भागीदार प्रत्येकानं बनावं

सुखासाठी कशासाठी प्रत्येकानं अहोरात्र झुरावं

पण दुःखाची चाहूल लागताच प्रत्येकानं

का नातं विसरावं ?

का म्हणून दुःखाच्या वाट्यालाच हे

दुःख का यावं ?सांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai