सागर वाव्हळ: कोण ?

कोण ?


कोण ?


खरं कोण आहेस गं तू माझी ?

मी दुःखात असताना

देतेस मनापासून साथ

मी संकटात असताना

देतेस ताणापासून हात.खरं कोण आहेस गं तू माझी ?

मी रडताना आसवे

गळतात गं तुझ्या डोळ्यातून

मी हसताना आनंद

ओसंडतो तुझ्या रोमारोमातूनखरं कोण आहेस गं तू माझी ?

वादळातील माझ्या जहाजाला

देतेस गं तूच किनारा.

हृदयात उचंबळनाऱ्या भावनांना !

देतेस गं तूच थारा.खरं कोण आहेस गं तू माझी ?

मी तुझ्याशी नातं जोडावं

एवढी लायकी नाही गं माझी

समाजबांधवांनी -रीवाजांनी

पंचाईत केली आहे गं माझीखरं कोण आहेस गं तू माझी ?

तुझी बदनामी होऊ नये

एवढीच इच्छा मनापासून

आहे गं माझी.

म्हणून खरं सांगतो

तू कोणीच नाही गं माझी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai