सागर वाव्हळ: निश्चय

निश्चय


निश्चय


आता मीही ठरवलंय

आलेल्या संकटांना धैर्याने, सामोरं जायचं,

अजिबात नाही डगमगायचं.समाजबांधवांना आता नाही जुमानायचं

नवीन समाजाला घडवायचं.आता मीही ठरवलंय

मोठं सपानं पहायचं

कष्ट उपसून ते मिळवायचं.कधीच नाही रडायचं

हसत दुःखांना कवटाळायचं.आता मीही ठरवलंय

सतत अरीष्टांशी लढायचं

मुर्दाड आयुष्य नाही जगायचंवेळ पडली तर मरणाला जवळ करायचं

पण सग्या सोयार्यांना नाही बोलवायचंआता मीही ठरवलंय !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © सागर वाव्हळ Urang-kurai