दुःखाचे दुःख
दुःखाचे दुःखसांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?का म्हणून सर्वांनीच आम्हास झिडकरावंसुखाचे स्वागत सुहास्य वदनानं प्रत्येकानंनेहमी करावं.पण सुखाचं अस्तित्व दुःखाविना नाहीहे भाबड्या मनांना कोणी समजावं ?सांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?का म्हणून सुखाचं भागीदार प्रत्येकानं बनावंसुखासाठी कशासाठी प्रत्येकानं अहोरात्र झुरावंपण दुःखाची चाहूल लागताच प्रत्येकानंका नातं विसरावं ?का म्हणून दुःखाच्या वाट्यालाच हेदुःख का यावं ?सांगा दुःखांनी कोठे दुःख व्यक्त करावं ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा